शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतमध्ये मालमत्ता धारकाचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !

By admin | Updated: April 1, 2017 17:00 IST

कोंडाळामहाली : गावातील मालमत्तेच्या नोंदीबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

कोंडाळामहाली : गावातील मालमत्तेच्या नमुना ८ अ, फेरफार नोंदीबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, सदर मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये लाभार्थीने मालमत्ता क्रमांक ९९ चे मालमत्ताधारक देविदास पांडूरंग भोसले यांच्या जागेचा नमुना ८ अ कोणत्या आधारे बनविण्यात आला, त्याबाबत फेरफार व नोंदीची माहिती शासकीय माहिती अधिकारी तथा कोंडाळा महाली गट ग्राम पंचायतचे सचिव नारायण महाले यांचेकडे १८ जानेवारी रोजी एका अर्जाद्वारे मागितली होती. विहीत मुदतीमध्ये त्यांनी माहिती दिली नसल्यामुळे २ मार्च २०१७ रोजी जोडपत्र ब नुसार गटविकास अधिकारी वाशिम यांचेकडे अपिल केले होते. या अपिलावर २७ मार्च रोजी सुनावणी झाली. यावेळी ग्रामपंचायत सचिव एन.के. महाले यांनी ग्रा.पं. कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीबाबत रेकॉर्ड उपलब्ध नाही असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. ग्राम पंचायत व देविदास भोसले यांनी संगनमत करुन सदर जागेची नमुना ८ अ मधील लांबी रुंदी ही खोटी बनविली असल्याचा आरोप माहिती अधिकारकर्ते गावंडे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केला.-----------------सदरची माहिती बाबत अर्ज आपणास प्राप्त झाला आहे. ही माहिती शासन दरबारी उपलब्ध नसून याबाबत तुम्ही पोलिसात तक्रार करा व कोर्टात केस दाखल करा.- व्हि.के. खिल्लारे (विस्तार अधिकारी), पंचायत विभाग, पं.स.वाशिम------------------सदर माहितीबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. - नारायण किसन महाले (सचिव), ग्राम पंचायत, कोंडाळा महाली