शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे!

By admin | Updated: April 18, 2017 01:19 IST

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत.

११५० कोटींचे उद्दिष्ट : वाटप झाले १०९ कोटीवाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत. त्यातही सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असून, उर्वरित राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाला शुक्रवार, ७ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत फारसा उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळेच पीक कर्ज वाटपाचा आकडा धिम्यागतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना सर्व बँका मिळून एकंदरित ११५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ११ दिवस उलटल्यानंतर त्यातील केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले असून १४ हजार १०८ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे, असे असले तरी उर्वरित १०४१ कोटी रुपये अद्याप वाटप करावे लागणार आहेत. त्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कुठल्याही स्थितीत ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पार पाडली जावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत. गतवर्षी १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले होते ८२३.४२ लाखांचे पीक कर्ज!सन २०१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ८२३.४२ कोटींचे पीक कर्ज काढले होते. पीक कर्ज वितरणात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६१ हजार ६४२ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज दिले होते. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३० हजार ६६ शेतकऱ्यांना ३०५ कोटी ४ लाख, खासगी बँकांनी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २५ कोटी ११ लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १० हजार ८४२ शेतकऱ्यांना १११ कोटी ५४ लाख रुपये पीक कर्ज वितरीत केले होते. त्या तुलनेत यंदा पीक कर्ज वाटपाची सुरूवात निराशाजनक राहिली आहे. पीक कर्ज वाटपाचा आलेख उंचावण्याकरिता जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यासमवेत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व्ही.एच.नगराळे यांनी तालुकास्तरावर बैठका घेणे सुरू केले असून, सोमवारी कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील बँक प्रतिनिधींची बैठक पार पडली. पीककर्जाची मागणी करणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मार्च एन्डींगमुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण होता. अशातच काही बँकांचे ‘आॅडिट’ देखील सुरू होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची गती मंदावली होती. आता मात्र पूर्ण दिमतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कर्जवाटपाचा आकडा निश्चितपणे वाढणार आहे.- व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम