शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:57 IST

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

ठळक मुद्देएक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत. 

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. गेल्या महिनाभरात टँकरच्या पाण्याचे दर तिप्पट झाल्याने नागरिकांना पाणीही विकत घेणे कठीण झाले आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी पुरेसा जलसाठा झाला नसल्याने १०० जलप्रकल्पांत आता केवळ कोरडा गाळच उरला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा हाहाकार सुरू असून, वापराची गोष्ट सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या या अडचणींचा फायदा खाजगी टँकरधारकांनी उचलायला सुरूवात केली आहे. एक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेल्या तात्पुरत्या योजना कोट्यवधी रुपये खर्चूनही बोंबलल्या आहेत. वाशिमची ८ कोटींची योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, तर मालेगावची १.३७ कोटींची योजना कंत्राटदार आणि पदाधिकाºयांच्या चुकीमुळे फसली आहे. मंगरुळपीरची योजना कुचकामी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र असतानाही या योजनेसाठी अद्यापही कामच सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात ही योजना १५ जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची अट शासन निर्णयातच नमूद असताना त्याला मुदतवाढ मागण्यात आली आहे. पूर्वी निर्धारित मुदतीनंतर या योजनेचे काम करूनही त्याचा फायदा होणार नसताना याचे काम सुरू असेल, तर कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  माणुसकीचा पडला विसर तहानलेल्यांना पाणी पाजणे हा खूप मोठा मानव धर्म आहे. प्रत्येक समाजात पाणी पाजने हे पुण्याचे काम मानले जाते. आता जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विहिरधारकांनी जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विहिरी खुल्या करणेही आवश्यक होते; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. विहिरीला भरपूर पाणी असलेल्या शेतकºयांनी तहानलेल्या लोकांची गरज ओळखून पाण्याचा बाजार भरविला आहे. वारेमाप पैशांची मागणी करतानाच टँकर हवे, असेल तर दोन दिवस आधी फोन करून मागणी नोंदवून घेण्याच्या सुचना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत.  मंगरुळपीर शहर वाऱ्यावरमंगरुळपीर शहरात पालिके ने लोकांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला; परंतु लगेचच तो बंद करून टँकरचे पाणी जलकुंभात सोडून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले; परंतु याचा फायदा अनेक प्रभागांना होत नसल्याचे दिसते. त्यातही जलकुंभात धरणातील गाळ मिश्रीत पाणी टाकून त्याचे शुद्धीकरण न करताच ते घाणपाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या आणि २० दिवसानंतर पाणी मिळालेल्या गोरगरीबांच्या पिण्यात हे पाणी आल्यास त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीMangrulpirमंगरूळपीर