रिसोड बसस्थानकाला खासगी प्रवासी वाहनांचा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:23 IST2018-02-08T01:22:48+5:302018-02-08T01:23:50+5:30

रिसोड बसस्थानकाला खासगी प्रवासी वाहनांचा विळखा!
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : बसस्थानकांच्या २00 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहन उभे करण्यास मनाई आहे. असा प्रकार आढळल्यास आगारप्रमुखांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास पोलिस विभागाच्या माध्यमातून संबंधित वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, रिसोड येथे दैनंदिन असा प्रकार घडूनही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
रिसोड येथून वाशिम, हिंगोली, मालेगाव, लोणी, लोणार यासह खेड्यापाड्यांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. बेकायदा प्रवासी वाहने बसस्थानकाजवळच उभी केली जातात आणि त्यांचे चालक बसस्थानकात प्रवेश करून अक्षरश: प्रवाशांची पळवापळवी करतात. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष पुरवायला हवे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.