शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

निवडणूक विषयक कामांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:19 PM

निवडणूक विषयक कामांना प्रथम प्राधान्य देवून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी विहित कालमयार्देत पार पाडावी.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होवू शकतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी त्यादृष्टीने सज्ज रहावे. तसेच विधानसभा निवडणूक विषयक कामांना प्रथम प्राधान्य देवून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी विहित कालमयार्देत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात शुक्रवारी आयोजित सर्व नोडल अधिकाºयांच्या आढावा सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, भूसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय  जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, अधीक्षक तथा तहसीलदार प्रशांत जाधव, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने नुकताच मुंबई येथे विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला असून कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होवू शकतो. त्यासोबतच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, निवडणूक खर्च विषयक विविध पथकांची स्थापना, मतदान यंत्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबी तातीडीने पूर्ण कराव्या लागतील. निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर १५ आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार असून त्याबाबत क्षेत्रीय अधिका?्यांचे अहवाल प्राप्त करून घेवून आवश्यक कार्यवाही करावी. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी सुरु राहणार असून या काळात जास्तीत जास्त महिला मतदार व नवमतदारांची नोंदणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रत्येक दिव्यांग मतदार मतदानाला यावा, यासाठी त्यांना आयोगाने निश्चित करून दिलेल्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याकरिता प्रत्येक मतदान केंद्रांवर किती दिव्यांग मतदार आहेत याची माहिती संकलित करून त्यानुसार वाहतूक व इतर नियोजन करावे. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात येणा?्या अधिकारी, कर्मचा?्यांचे प्रशिक्षण घेवून त्यांना मतदान यंत्र हाताळणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जेणेकरून प्रत्यक्ष मात्दानाप्रसंगी कोणतीही समस्या उद्भवणारा नाही. ह्यस्वीपह्णच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय