ध्वनीप्रदुषणावर पोलिसांचा राहणार 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:07 IST2020-08-11T12:07:04+5:302020-08-11T12:07:16+5:30
जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाने १६ ध्वनीप्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले.

ध्वनीप्रदुषणावर पोलिसांचा राहणार 'वॉच'
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाने १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी १० आॅगस्ट रोजी केले.
ध्वनी प्रदुषणावर वॉच राहावा म्हणून उपविभागीय तसेच पोलीस स्टेशन स्तरावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड, वाशिम शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंपणे, रिसोडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, अनसिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसरे, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शेंबळे, मानोराचे पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, धनजचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषण होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन वसंत परदेशी यांनी केले.
अशी आहे जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीराम घुगे हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.