गुड मॉर्निंग पथकाची पोलीस कारवाई
By Admin | Updated: April 24, 2017 20:52 IST2017-04-24T20:52:50+5:302017-04-24T20:52:50+5:30
वाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा, सनगाव आणि आसेगाव येथे जिल्हा कक्षाच्या वतीने गुड मॉर्निंग मोहिम राबवुन पोलीस कारवाई करण्यात आली.

गुड मॉर्निंग पथकाची पोलीस कारवाई
वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत आज मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा, सनगाव आणि आसेगाव येथे जिल्हा कक्षाच्या वतीने गुड मॉर्निंग मोहिम राबवुन दोन जनांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधाकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्यातील अनेक गावांमध्ये गुड मॉर्निंगची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. २४ एप्रिल रोजी मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा येथील अशोक राठोड व सनगाव येथील सिताराम भगत अशा दोन युवकांना गुड मॉर्निंग पथकाने पकडले. त्यांना आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये नेऊन समज देण्यात आली. यापुढे उघड्यावर शौचास न जाण्याचे व संडास बांधण्याचे लेखी जबाब नोंदवुन पोलीसांनी त्यांची सुटका केली.
पथकामध्ये जिल्हा कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अमित घुले,तालुका समन्वयक अभय तायडे यांची उपस्थिती होती.