प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २९ जुलैपर्यंत मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 03:19 PM2019-07-24T15:19:49+5:302019-07-24T15:19:54+5:30

वाशिम : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 PM crop insurance plan extended till July 29! | प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २९ जुलैपर्यंत मुदतवाढ!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २९ जुलैपर्यंत मुदतवाढ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र अथवा बँकेत विमा प्रस्ताव सादर करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाºया शेतकºयांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) अथवा बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मोडक यांनी केले आहे.

Web Title:  PM crop insurance plan extended till July 29!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.