शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पुराव्यानंतरच दाखला द्या!

By admin | Updated: April 19, 2017 01:11 IST

उपनिबंधकांचे निर्देश : गुरांच्या बाजारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

रिसोड / वाशिम: जनावरांची कोणत्याही प्रकारे पाहणी न करताच खरेदी-विक्रीची अधिकृत पावती दिली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी समोर आणला. याची दखल घेत यापुढे ओळखीचा पुरावा आणि जनावर पाहणी केल्यानंतरच ‘दाखला’ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले.चोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सहकार व पणन विभागाने काही बंधने घालून दिलेली आहेत. ही बंधने गुरांच्या बाजारात पाळली जात नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली होती. त्यानुसार रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम यासह अन्य बाजार समितीतील गुरांच्या बाजारात पाहणी केली असता काही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला जातो तर काही ठिकाणी कोणताही पुरावा न मागता व जनावरांची पाहणी न करताच अधिकृत पावती दिली जात असल्याचे आढळून आले. हा प्रकार बहुतांश बाजार समितीतील गुरांच्या बाजारात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सूचना असतानाही, गुरांच्या बाजारात पावती बनविताना या नियमांकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोख लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे या उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे; मात्र असा कोणताही ओळखीचा पुरावा न दाखविता आणि जनावरांची पाहणी न करताच गुरांच्या बाजारात खरेदी-विक्रीचा दाखला दिला जात असल्याचे स्टिंग आॅपरेशनने समोर आणले होते. याची दखल घेत खरेदीदार व विक्रेता यांचा ओळखीचा पुरावा घ्यावा तसेच जनावरांची पाहणी करावी, त्यानंतरच दाखला देण्यात यावा, अशा सूचना उपनिबंधकांनी दिल्या. गुरांच्या बाजारात चोरीच्या जनावरांची विक्री होऊ नये म्हणून बाजार समिती प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी, अशा सूचनाही उपनिबंधक खाडे यांनी केल्या.