शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST

वाशिम : पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर ...

वाशिम : पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या संदर्भातील निर्देश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर आणि कारंजाच्या गटविकास अधिकाऱ्यांना ३० ऑगस्ट रोजी दिले आहेत.

जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. यात जलसंधारण, मृद संधारणासह, वृक्ष लागवड या प्रमुख कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे लोकसहभागातून केली जात असली तरी काही कामे प्रशासनाच्या सहकार्यातून ही केली जात आहेत. आता पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४३ ग्रामपंचायतींत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन गावकऱ्यांकडून केले जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षरोप उपलब्ध केली जाणार आहेत.

---------------

या गावांत होणार वृक्ष लागवड

कारंजा तालुका (२४) : जानोरी, विळेगाव, अंतरखेडा, जामठी, बेलमंडळ, पोहा, उंबर्डा बाजार, काकड शिवणी, शिवनगर, दोनद, गायवळ, नारेगाव, बेलमंडळ, शेलूवाडा, धोत्रा देशमुख, धोत्रा जहॉगीर, शिवण, पिंपळगाव, बांबर्डा, बेलखेडा, शहादतपूर, आखतवाडा, पिंप्री मोडक, रामनगर.

०००००००००००००

मंगरुळपीर तालुका (१९) : लखमापूर, बोरव्हा, शेंदुरजना मोरे, सायखेडा, घोटा, स्वासीन, जांब, पिंप्री खु, चिंचाळा, लाठी, पिंपळखुटा, शेलगाव, तपोवन, नागी, पिंप्री (अवगन), उमरी बु., जनुना, जाेगलदरी, पारवा.

---------------

रोहयोतून मजुरांच्या हाताला काम

पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करणे हाच उद्देश नाही, तर या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामही दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातून किमान पाच मजुरांच्या आधारे ४३ ग्रामपंचायतींत ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीनंतर याच कामगारांना या वृक्षांच्या संगोपन आणि संवर्धनाचे कामही दिले जाणार आहे.

००००००००००००००००

काय आहे बिहार पॅटर्न

धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्ष लागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे लावलेली झाडे जगवता येऊ शकतात. त्याचे सरंक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. त्या व्यक्तीच्या नावावरून त्या संकल्पनेला अर्थात वृक्ष लागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न ’ असे नामकरण केले गेले. ‘ बिहार पॅटर्न ’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.

०००००००००००००००००००००००

कोट:

समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावांचा सर्वांगीण विकास हेच पाणी फाउंडेशन स्पर्धेमागील उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन आणि त्यातून दीर्घकाळ मजुरांच्या हाताला काम, याच उद्देशाने सहभागी ४३ गावांत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड केली जाणार आहे.

-सुभाष नानवटे,

जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन