प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:46 IST2017-10-13T19:45:28+5:302017-10-13T19:46:35+5:30
: स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत प्रदूषणमुक्त दिवाही साजरी करण्याची शपथ १२ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आली .

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत प्रदूषणमुक्त दिवाही साजरी करण्याची शपथ १२ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आली .
पर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी व निरोगी वातावरण राखण्यासाठी प्रदूषण मुक्त प्लॉस्टिकमुक्त, फटाके न वाजवता दिवाळी साजरी करूया व महापुरूषांचे विचार समाजात रूजवून विकसीत राष्ट्र बनवून देशाला हातभार लावू अशी शपथ वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी यांनी सांगितले़ दिवाळी उत्सवात फाटाक्यांची आतषबाजी करून धुराचे व ध्वनीचे प्रदूषन मोठ्या प्रमाणात होत असते़ याबाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाण जनजागृती व्हावी, याकरीता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घ्यावी असा राज्य शासनाचा आदेश आहे़ त्याअनुषंगाने ही शपथ घेण्यात आली यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे नेते भागवत मापारी, नारायण
शिंदे, प्रसाद देशमुख, अतुल शिंदे, संतोषराव कोल्हे, ऋषीकेश देशमुख, वैभव विरकर, मंगेश शिंदे, किसनराव शिंदे, योगेश खोडके, देवा बरडे, उपस्थित होते़