पिंपळगाव-कुंभी रस्त्यावर कुटार भरलेला ट्रॅक्टर उलटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 14:21 IST2018-11-14T14:20:39+5:302018-11-14T14:21:08+5:30
आसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर येणाºया पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात सुरेश बिबीचंद राठोड या शेतकºयाचे कुटार भरून जाणारा ट्रॅक्टर उलटला

पिंपळगाव-कुंभी रस्त्यावर कुटार भरलेला ट्रॅक्टर उलटला!
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर येणाºया पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात सुरेश बिबीचंद राठोड या शेतकºयाचे कुटार भरून जाणारा ट्रॅक्टर उलटला. बुधवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र, शेतकरी राठोड यांचे आर्थिक नुकसान झाले.
सद्या शेतशिवारांमधून सोयाबिनची काढली झाली. त्याचे शिल्लक राहिलेले कुटार जनावरांसाठी खाद्य म्हणून साठविले जात आहे. त्यानुसार, श्ेतकरी सुरेश राठोड हे आपल्या एम.एच. ३० ए ९५४१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरव्दारे कुटार भरून जनावरांच्या गोठ्यावर नेत असताना बुधवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात उलटला. यात सुदैवाने ट्रॅक्टर चालकास कुठलीही दुखापत झाली नाही; परंतु ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.