विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:36 IST2018-09-18T13:35:25+5:302018-09-18T13:36:05+5:30

मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील हिसई येथील विवाहीत महिलेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मंगरु ळपीर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आ

Physical, mental torture; criminal case against Six people | विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 
मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील हिसई येथील विवाहीत महिलेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मंगरु ळपीर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मंजुळा अनिल पांडे (२५),रा हिसई ह.मु. मोतसावंगा या विवाहितेने तक्रार दिली की, आरोपी अनिल पांडे व इतर पाच जणांनी संगनमत करून फिर्यादिस दुचाकी घेण्यासाठी माहेरवरून ६० हजार रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी मान्य पूर्ण करण्यात विवाहितेच्या माहेरची मंडळी असमर्थ असल्याने आरोपींनी विवाहितेला सतत  मारहाण करीत तिचा मानसिक छळ केला, अशा प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हेकॉ अरविंद सोनोने व नापोकॉ महादेव सोळंके करीत आहेत.

Web Title: Physical, mental torture; criminal case against Six people