कारंजा - अमरावती महामार्गावरअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:18 IST2018-02-26T19:18:21+5:302018-02-26T19:18:21+5:30
कारंजा लाड : कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

कारंजा - अमरावती महामार्गावरअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक गंभीर
कारंजा लाड : कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्रीमोडक येथील रहिवासी बंडू पुंडलिक राठोड माळेगाव येथील गॅसप्लॅन्टवर ट्रक चालविण्याचे काम करतो. २५ फेब्रुवारी रोजी रात्री गॅस प्लॅन्टवरील आपले काम आटपून आपल्या एम.एच.३७ एन.७४४८ क्रमांकाच्या दुचाकीने पिंप्रीमोडक येथे घरी जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बंडू पुंडलिक राठोड वय २३ वर्ष हा जागीच ठार झाला. तर बाळू किसन चव्हान वय ४५ वर्ष रा.बोदेगांव हो गंभीर जखमी झाले. जखमीला प्राथमिक उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ अमरावती येथे रवाना करण्यात आले. दरम्यान धनज पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, घटनेचा अधिक तपास व अज्ञात वाहनाचा शोध धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषीर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गावंडे घेत आहे.