ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 10:57 IST2021-01-20T10:57:44+5:302021-01-20T10:57:52+5:30
Gram Panchayat Election जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते.

ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांचा टक्का वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी, यापेक्षा अधिक संख्येने महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण सदस्य संख्येच्या जवळपास ५४ टक्के महिला ग्रामपंचायतींच्या सत्तेत पोहोचल्या आहेत. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने चमकदार कामगिरी करीत आहेत. राजकारणातही महिला सक्रिय होत असून, ग्रामपंचायतमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी निवडणूक झाली. जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ५० टक्के महिला सरपंचपदी विराजमान होतील.
रिसोड, कारंजा तालुक्यात महिलांचे प्रमाण जास्त
ग्रामपंचायत निवडणुकीत रिसोड, कारंजा तालुक्यात महिला उमेदवारांचा प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण नसतानाही सर्वसाधारण प्रवर्गातून महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के आरक्षणापेक्षा अधिक संख्येने महिला विजयी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधण्याला प्राधान्य देऊ, असा सूर महिला उमेदवारांमधून उमटला.