मंगरुळपीर (वाशिम): शहरातील मध्यवर्ती भागातील नगर पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील करार संपलेली ४७ दुकाने (गाळे) १५ दिवसांत थकीत भाड्यासह खाली करावी, अशा आशयाची नोटीस मूळ लिलावधारकांना नगर परिषदेच्यावतीने बजावण्यात आली आहे. ...
वाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
कारंजा लाड : येथील किसनलाल नथमललाल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गजानन पेढीवाल यांनी आत्महत्येप्रकरणी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन जणांची नावे असून, त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक सं ...
कारंजा लाड : लोककलावतांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२:३० वाजता विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : बालपणापासून आपल्या रक्तात शिवसेना असून, शिवसेना हाच माझा श्वास आहे, शिवसेना आपण कधीही सोडणार नाही, त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी सोमवारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले ...
वाशिम : कारंजा तालुक्यातील भामदेवी येथे गतवर्षी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रत्येक व्यक्तीने एक या प्रमाणे एकूण २५०० रोपांची लागवड केली. या रोपांचा मुलांप्रमाणे सांभाळ केल्याने शासकीय मालकीच्या जमिनीवर ही रोपे आता मोठ्या दिमाखात डोलत आहेत. ...
मानोरा : येथील लघुसिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी बांधकाम खचले आहे, तर निवासस्थानात सुविधा नाही. कर्मचारी मात्र या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. ...
मेडशी : मेडशी येथील ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून ३१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे ३१ जुलैला असलेली मासिक सभा सरपंच रेखा मेटांगे यांनी तहकूब केली. ...
शिरपूर जैन : येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने २९ जुलै रोजी हर्षोल्लासात श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचा निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला. ...