ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी वीजदेयक अदा करण्यासाठी सोयीचे असलेल्या टपाल कार्यालयात चार महिन्यांपासून पावती पुस्तकाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची देयके रखडत असल्याने त्यांना देयक अदा करण्यास विलंब झाल्याप्रकरणी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. ...
वाशिम शहरात आॅनलाईन जुगाराचा (चक्री) अवैध धंदा चांगलाच फोफावल्याची माहिती पोलीसांना प्राप्त होताच रिसोड नाक्यावर सुरू असलेल्या एका आॅनलाईन जुगारावर छापा टाकला. ...
चोरीच्या घटनेतील आरोपीने दोन पोलीसांना गुंगारा देऊन पोबारा केल्याची घटना २३ व २४ नोव्हेंबरच्या दरम्यान वाशिम येथे घडली. याप्रकरणी दोन पोलीसांसह एका अज्ञात इसमाविरूध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
राज्यात रब्बी हंगाम २०१७-१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती), हरभरा व करडई या प्रमुख पिकांना ही योजना लागू असून १ जानेवारी २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. ...
कारंजा तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, फसवणूक करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी २४ नोव्हेंबर रोजी बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त केला. ...
माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपीक गोविंद टाले यांनी पाळोदी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ लिपीकाकडून खासगी इसमाद्वारे पाच हजार रूपये लाच स्विकारल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने खासगी ईसम व संबंधित लिपीक अशा द ...
शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी करण्यात येणार आहे. ...
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील नव्याने घोषीत राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती व बांधकाम वेळेत व्हावे या उद्देशाने मे २०१७ मध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ...
मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आलेल्या कुंभी ते धानोरा रस्त्याची अल्पावधीतच दैना झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. ...
वाशिम: लाभार्थी निवडीकरिता २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय रोजगार मेळाव्यांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे. ...