रिधोऱ्याच्या शेतकऱ्याने केली सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:32 IST2020-12-27T17:31:37+5:302020-12-27T17:32:40+5:30

Organic jaggery १५ दिवसांपासून सेंद्रीय पद्धतीने गुळ निर्मिती केली जात आहे.

Organic jaggery production by Ridhora farmers | रिधोऱ्याच्या शेतकऱ्याने केली सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती

रिधोऱ्याच्या शेतकऱ्याने केली सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती

ठळक मुद्देदिवसाकाठी जवळपास १५ क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते. अन्य शेतकरीदेखील रिधोरा येथे मार्गदर्शनासाठी जात आहेत.

शिरपूर जैन : रिधोरा येथील बढे नामक शेतकऱ्याने सेंद्रीय गुळ निर्मितीचा प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली.
नांदेड-अकोला मार्गावरील मालेगावपासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या रिधोरा येथील बढे यांच्याकडे सिंचनाची सुविधा असल्याने ते दरवर्षी ऊसाची लागवड करतात. सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती करण्यासाठी त्यांनी ‘गुऱ्हाळ’ उभारले. स्वत:च्या शेतातील ऊस आणि गुऱ्हाळ याची सांगड घालत यावर्षीच्या हंगामात गत १५ दिवसांपासून सेंद्रीय पद्धतीने गुळ निर्मिती केली जात आहे. दिवसाकाठी जवळपास १५ क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते. सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती करणाऱ्या या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी अन्य शेतकरीदेखील रिधोरा येथे मार्गदर्शनासाठी जात आहेत. शेतीत नवीन प्रयोग करीत बढे यांनी इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली.

Web Title: Organic jaggery production by Ridhora farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.