Opportunity for new faces in Gram Panchayat | ग्रामपंचायतीत नवीन चेहऱ्यांना संधी

ग्रामपंचायतीत नवीन चेहऱ्यांना संधी

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात अनेक प्रस्थापित ग्रामपंचायत सदस्यांना हादरा बसून मतदार बांधवांनी काही नवीन चेहऱ्यांसह दोन जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली.

येथील प्रभाग क्र. ४ मध्ये सिंधूताई अशोक मोरे या केवळ एका मताने विजयी झाल्या. प्रभाग क्र. ५ मधून दुर्गाताई सुभाष घोडे २२७ मतांनी विजयी झाल्या.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १ मधून रवी काशीनाथ श्रीराव (२४४), सारिका अशोकराव नेमाडे (३३७), निर्मला अरुण उघडे (३२७), प्रभाग क्र. २ मधून राज नरहरी चौधरी (२८०), कमरुन्निसा अब्दुल जब्बार(१९१), प्रभाग क्र. ३ मधून रघुनाथ पिसाजी भगत (१७२) रंजना अरूण इंगोले (१६३), प्रभाग क्र. ४ मधून शरद पांडुरंग पचगाडे (३५९) अशोकराव रामचंद्र ढोरे (३३७) , सिंधू अशोक मोरे ३२८, प्रभाग क्र. ५ मधून भारत विठ्ठलराव कानडे (३६५), दुर्गाताई सुभाष घोडे (४७२), कांचन योगेश श्रीराव (४२३) मताधिक्क्याने विजयी झाल्या.

गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली चौकी जमादार कैलास गवई, राजू बंगाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गावातून रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी गावातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले.

Web Title: Opportunity for new faces in Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.