Operation Muskan: 20 girls are still missing in Washim | Operation Muskan : २० मुलींचा अद्यापही लागला नाही शाेध!

Operation Muskan : २० मुलींचा अद्यापही लागला नाही शाेध!

ठळक मुद्दे७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला.ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : हरवलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारच्या आदेशान्वये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत   जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत एकही मुलाचा शाेध लागलेला नाही. तसेच जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान हरविलेल्या, पळून गेलेल्या ७९ मुलींपैकी ५९ मुलींचा व घरून पळून गेलेल्या चारही मुलांचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले असले तरी अद्याप २० मुलींचा शाेध लागलेला नाही.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पळून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या मुलांचा शाेध पाेलीस विभागाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून, ३१ डिसेंबरनंतर या माेहिमेतील कामगिरीबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे पाेलीस विभागाकडून सांगण्यात आले.

घरून पळून गेलेली मुले वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथील
वाशिम जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून पळून निघून गेलेल्या मुलांमध्ये जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथील मुलांचा समावेश आहे. घरातील कटकट, काही तरी करण्याची मनी जिद्द या कारणामुळे ही मुले घरून पळून गेली हाेती. या मुलांना मुंबई, पुणे, नागपूर येथून पाेलिसांनी शाेधले व त्यांच्या      कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.


पळून जाणाऱ्या मुली विविध प्रलाेभनांच्या बळी 
जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून निघून गेलेल्या, पळून गेलेल्या तब्बल ७९ मुलींपैकी बहुतांश मुली या लग्नाचे आमिष, नाेकरी लावून देण्याच्या प्रलाेभनामुळे घरून पळून गेल्या. यातील काही मुली स्वत:हून घरी परतल्या तर काहींचा पाेलिसांनी शाेध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला. अद्याप २० मुलींचा शाेध सुरू आहे.


ऑपरेशन मुस्कानद्वारे मुलांचा शाेध घेणे सुरू
जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत १ ते ३० डिसेंबरदरम्यान बेपत्ता, हरवलेल्या मुलांचा शाेध घेणे सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील मुलगा घरून निघून गेलेल्यांपैकी एकही शाेध बाकी नाही. आतापर्यंत हरविलेल्या चारही मुलांचा शाेध पाेलिसांनी घेऊन मुलांना पाल्यांच्या स्वाधीन केले. मुलींचा शाेध घेणे सुरू आहे.


सर्व पाेलीस स्टेशनला ऑपरेशनच्या सूचना
जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात असून यासंदर्भात सर्व पाेलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत. घरुन निघून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या जवळपास मुलांचा शाेध यापूवीर्च लागला आहे. ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.
- शिवा ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखा

Web Title: Operation Muskan: 20 girls are still missing in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.