शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

९१ गावाच्या सुरक्षेसाठी मानोरा पोलिसाकडे एकच गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 2:54 PM

मानोरा : ९१ गाव पर्यंत पोचण्यासाठी मानोरा पोलिसाच्या ताफ्यात एकच वाहन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : ९१ गाव पर्यंत पोचण्यासाठी मानोरापोलिसाच्या ताफ्यात एकच वाहन आहे. एकाच वेळेस अनेक घटना तालुक्यात घडतात, त्यापर्यतं पोहचण्यासाठी पोलिसाची चांगलीच तारांबळ उडते किंवा पोलिसांना दुचाकीचा मार्ग अवलंबा लागतो.मानोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ९१ गावे येतात, ती गावे पाच बिटजमध्ये विखुरली गेली आहे. ८१ गावाच्या सुरक्षेसोबत अनेक घडामोडी सुध्दा घडत असतात. त्यामध्ये सन उत्सव, विविध मागण्यासाठी आंदोलने नेहमीच सुरु असतात. या शिवाय तालुक्यात विविध घटना दैनंदीन आहे. त्या प्रकरणाचा निपटारा, किंवा आरोपीच्या गळ्यापर्यंत हात पोचविण्यासाठी एकच वाहन असल्यामुळे ऐकाच वेळेस इतर ठिकाणी जाण्यास तारांबळ उडते. पोलिस निरीक्षकांना अनेकदा बैठकीसाठी वाशिमला जावे लागते. कोणत्याही कामासाठी गाडी वाशिमला गेल्याने इतर ठिकाणी जाण्यास चांगली पंचाईत होते. पोलिस निरीक्षकाच्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक ,पोलिस उपनिरीक्षक चा पोस्टींग आहेत. अधिकाऱ्याचा दरारा घटनेपर्यंत गाडीने गेल्यानेच अवलंबुन असतो. अनेक गावामध्ये अवैध दारुसोबत जुगार मोठ्या प्रमाणात चालु असता. पोलिसांनी कितीही कारवाई केली तर परत दुसºया दिवशी व्यवस्था जैसे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी हाणामारी च्या घटना घडतात, अशा घटनांना आवर घालण्यासाठी व अधिकाऱ्यांना घटनेपर्यंत पोहोचविण्यासाठी मानोरा पोलिसांच्या ताब्यात एका वाहनाची गरज आहे अशी मागणी नागरिकांतुन सुध्दा होत आहे. तसेच याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष पुरवून येथील वाहनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराPoliceपोलिस