अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:34 IST2018-04-14T14:34:18+5:302018-04-14T14:34:18+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते.

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!
शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. यंदा मात्र एप्रिलच्या पंधरवड्यातच या प्रकल्पाची पाणीपातळी १२ टक्क्यांपर्यंत खालावली असून आगामी काही दिवस काटकसरीने पाणी वापर न केल्यास रिसोड, शिरपूर यासह रिठद, वाघी बु. या गावांमध्ये ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.
गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. यामुळे शेतीच्या सिंचनाकरिता सोडल्या जाणाºया पाण्यावरही जलसंपदा विभागाने लवकरच निर्बंध लादले होते. मात्र, तापत्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि अधूनमधून पिण्याकरिता चार गावांना पाणी सोडले जात असून सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तो आगामी जून महिन्यापर्यंत पुरणे अशक्य आहे. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो. त्यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. यासंदर्भात समाजातूनही प्रभावी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.