पाटील महाविद्यालयात ऑनलाइन सेमिनार स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:45+5:302021-02-10T04:40:45+5:30

अमरावती विद्यापीठात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व महाविद्यालायांचे शैक्षणिक कार्यक्रम प्रभावित होत असताना शैक्षणिक उपक्रम अखंडित राहण्यासाठी स्नातकीय विध्यार्थ्यांसाठी विद्यापीठस्तरीय ...

Online seminar competition at Patil College | पाटील महाविद्यालयात ऑनलाइन सेमिनार स्पर्धा

पाटील महाविद्यालयात ऑनलाइन सेमिनार स्पर्धा

Next

अमरावती विद्यापीठात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व महाविद्यालायांचे शैक्षणिक कार्यक्रम प्रभावित होत असताना शैक्षणिक उपक्रम अखंडित राहण्यासाठी स्नातकीय विध्यार्थ्यांसाठी विद्यापीठस्तरीय ऑनलाइन सेमिनार स्पर्धेचे आयोजन इनऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयावर शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विभागप्रमुख रसायनशास्त्र, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती डॉ. डब्लू. एस. मराठे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. बी. देव्हडे, प्रमुख पाहुणे डॉ. पी. आर. राजपूत, अध्यक्ष अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र शिक्षक संघटना व प्राचार्य एसएसएस के. आर. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड तथा डॉ. किशोर पुरी, सचिव अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र शिक्षक संघटना व प्राध्यापक श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. देव्हडे यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून केले. अमरावती विद्यापीठाच्या सर्व जिल्ह्यातील एकूण २९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यांच्या मूल्यमापनाची जबाबदारी डॉ. डी. एम. नागरिक जी. एस. विज्ञान महाविद्यालय खामगाव व डॉ. डी. बी. दुपारे, डॉ. आर. जी. राठोड विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर यांनी पार पाडली.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्नेहा दर्यानी, डॉ. आर. जी. राठोड महाविद्यालय मूर्तिजापूर यांना, तर द्वितीय पारितोषिक रुचिता तोडकर, जी. एस. महाविद्यालय खामगाव, तृतीय पारितोषिक समिघा शेख, फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, साक्षी देऊळकर, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ या विध्यार्थ्यांना मिळाले. सर्व आयोजकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत राहावा या उद्देशाने संघटना वाटचाल करीत राहील, अशी प्रमुख पाहुणे डॉ. पी. आर. राजपूत यांनी सदिच्छा व्यक्त केली. संघटनेचे सचिव डॉ. पुरी यांनी कोविड -१९ चा प्रभाव असून सुद्धा विद्यार्थ्यामध्ये विषयाची आवड तसेच चिकाटी टिकून राहावी या उद्देशाने ऑनलाइन पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे नमूद केले. या संघटनेचे नावीन्यपूर्ण व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यास महाविद्यालय अग्रेसर आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य जे. बी. देव्हडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेकारिता विभागप्रमुख, डॉ. शेळके, डॉ. बदर, डॉ. फाटक, प्रा. जाधव, प्रा. कानडे व प्रा. उंबरकर यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Online seminar competition at Patil College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.