वाशिममध्ये शेतमाल विक्रीसाठी २८२ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:27 IST2018-11-30T13:26:57+5:302018-11-30T13:27:13+5:30
वाशिम : ‘एफसीआय’मार्फत येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार उडिद, सोयाबिन आणि मूंगाची खरेदी केली जाणार आहे.

वाशिममध्ये शेतमाल विक्रीसाठी २८२ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘एफसीआय’मार्फत येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार उडिद, सोयाबिन आणि मूंगाची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी बुधवार, २८ नोव्हेंबरपर्यंत २८२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असून त्यात सर्वाधिक प्रमाण उडिदाचे आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नारायण कडवे यांनी दिली.
सन २०१८- १९ मधील खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद व सोयाबीनचे दर मंजूर केलेले आहेत. त्यानुसार, मूगाला प्रतिक्विंटल ६९७५ रुपये, उडीद ५६०० रुपये आणि सोयाबीनला ३३९९ रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाणार आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबर या मुदतीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करणाºया शेतकºयांकडून मूग व उडीद खरेदी २३ डिसेंबरपर्यंत केली जाणार असून सोयाबीनची खरेदी ५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी वाशिम येथे तालुका खरेदी विक्री संघाकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून २८ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी झालेल्या २८२ शेतकºयांपैकी ३० शेतकºयांना मोबाईलव्दारे संदेश पाठवून माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कडवे यांनी दिली.
लाल दोऱ्यांअभावी खरेदी प्रक्रिया लांबली!
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर बारदाना लाल दोºयाने शिवून घेण्याचे बंधन ‘एफसीआय’ने संंबंधित संस्थांना घालून दिले आहे. मात्र, वाशिम आणि अकोला येथील बाजारपेठेत हा दोरा उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, अमरावती येथून हा दोरा उपलब्ध करून लवकरच खरेदी सुरू केली जाईल, असे तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नारायण कडवे यांनी सांगितले.