ट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:25 IST2020-09-27T16:25:13+5:302020-09-27T16:25:31+5:30
शांताबाई हमंत (६५) रा. सोनखास ता. मंगरूळपीर असे मृतक महिलेचे नाव आहे.

ट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : सोयाबीन सोंगणीसाठी शेतमजूर घेऊन जाणाºया ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक महिला ठार तर १६ जण जखमी झाल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेलगाव ते वसारी या दरम्यानच्या वळणाणार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. शांताबाई हमंत (६५) रा. सोनखास ता. मंगरूळपीर असे मृतक महिलेचे नाव आहे.
सोयाबीन सोंगणीचा हंमाम सुरू झाला असून, शेतकºयांसह मजुराची त्यासाठी लगबग पाहावयास मिळते. बाहेरगावचे शेतमजूर आणून अनेक शेतकरी हे शेतमाल घरी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. शिरपूर येथील ४० ते ४५ महिला या एम.एच. ३७ एल ६०४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन सोंगणीसाठी वाशिम तालुक्यातील हिवरा रोहिला येथे जात होत्या. शेलगाव ते वसानी दापुरी दरम्यानचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात शांताबाई हमंत ही महिला जागेवरच ठार झाली तर नर्मदा पुरुषोत्?तम व्यवहारे (४४), पूजा प्रदीप खोरणे (२२), आशा किसन चोपडे (४०), लिलाबाई शंकर लहांमगे (४०), रूपाली रवी लहांमगे (२२), दुर्गा राजू चोपडे (४४), वर्षा संतोष चौधरी (३५), शारदा किरण कापकर (४०), सानिका विठ्ठल कुटे (१५), अनुसया विश्वनाथ खोरणे (४०), आशा सुभाष जाधव (३२), सानिका विनोद जाधव (१२), मीना प्रकाश बोबडे (२५), गुना त्रिभुवन वानखेडे (२२), रेखा पिराजी कांबळे (४०), पूजा गजानन कांबळे (२२) या १६ महिला मजूर जखमी झाल्या. जखमींवर शिरपूर आरोग्यवर्धनी केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. यावेळी आरोग्य वर्धनी केंद्रात मोठी गर्दी उसळली होती. घटनास्थळाला प्रभारी ठाणेदार उदय सोयस्कर यांनी भेट दिली. इतर काही जखमींना परस्पर उपचारासाठी नातेवाईकांनी विविध दवाखान्यामध्ये नेले. ट्रॅक्टर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला.