शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार, तीन जखमी

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात तीन अपघात.

वाशिम : कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात रविवार १४ डिसेंबर रोजी वेगवेगळय़ा ठिकाणी घडलेल्या तीन अपघातात २२ वर्षीय युवक ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. मंगरुळपीर येथील मोहगव्हाण फाट्यनजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चांभई येथील सतीश पांडुरंग वसू या २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिसांत फिर्यादी सुरेश रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की सतीश पांडुरंग वसू हा रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एमएच-३७, एन-९९९४ क्रमांकाची मोटारसायकल निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवित असताना मोहगव्हाण फाट्यानजीक त्याची मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाविरुद्ध २७९, ३0४ अ, भादंविच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे रविवारीच सकाळी ८.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या दुसर्‍या एका अपघातात एमएच-४0, वाय १७१२ क्रमांकाच्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवित धडक दिल्यामुळे प्रल्हाद शिंदे हे जखमी झाले. या प्रकरणी मोठी उमरी अकोला येथील रहिवाशी विजय प्रल्हाद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगरुळपीर पोलिसांनी वाडी नागपूर येथील रहिवाशी आरोपी ट्रकचालक विनोद मारोती मंजूळकरविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, नुसार गुन्हा दाखल केला आहे. कारंजा येथे रविवारी सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास दुचाकी आणि मारोती आल्टोची धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.