one dead by electrick shock in washim district | विजेच्या धक्क्याने पीठगिरणी मालकाचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने पीठगिरणी मालकाचा मृत्यू

  उंबर्डाबाजार ( वाशिम ): धनज बु! पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम मेहा येथील पीठ गिरणी मालकाचा  विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
           ग्राम मेहा येथील प्रेमसिंग हनुमान सिंग चंदेल (३५) हे पीठ गिरणीच्या माध्यमातून आपल्या कुटूबियांचे पालन पोषण करून चरितार्थ चालवित होते . नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर  रोजी ते पीठ गिरणीत गेले असता विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला . 
       काही सेवाभावी ग्रामस्थांनी प्रेमसिंग यांना धनज बु ! येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.  मृतक प्रेमसिंग  यांचे मागे पत्नी,  तीन मुली, आई, वडील, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे . घटनेचा पुढील तपास धनज बु. पोलीस करीत आहे .

Web Title: one dead by electrick shock in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.