वाटमारी प्रकरणातील एका आरोपीस अटक
By Admin | Updated: July 17, 2017 02:46 IST2017-07-17T02:46:56+5:302017-07-17T02:46:56+5:30
शिरपूर पोलिसांची कारवाई : आरोपी केशवनगर येथील

वाटमारी प्रकरणातील एका आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : तालुक्यातील कंझरा फाटा येथे १२ जुलै रोजी रात्री घडलेल्या वाटमारी प्रकरणातील एका आरोपीस शिरपूर (ता.मालेगाव) पोलिसांनी १६ जुलै रोजी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलैला रात्री ८.३० वाजता कंझरा फाटा येथे दोन पल्सर वाहनावर आलेल्या अज्ञात चार जणांनी पिंपळखुटा येथील गणेश परंडे व त्यांच्या भावाचे चारचाकी वाहन अडवून ३५ हजार रुपये पळविले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचा तपास सुरु असताना १६ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी रामेश्वर खंदारे (रा.केशवनगर ता.रिसोड, जि.वाशिम) यास अटक केली आहे. त्यास मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.