जुन्या वैमनस्यातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 17:48 IST2019-08-17T17:48:31+5:302019-08-17T17:48:36+5:30
फाळेगाव थेट येथे जुन्या वैमानस्यातून ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हल्या करण्यात आली

जुन्या वैमनस्यातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या फाळेगाव थेट येथे जुन्या वैमानस्यातून ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हल्या करण्यात आली. ही घटना शनिवार, १७ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी अनसिंग पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली.
भारत रामचंद्र कोरडे (वय ३८ वर्षे, रा. फाळेगाव थेट) यांनी अनसिंग पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी केशव सुदेभान जाधव, संतोष केशव जाधव, बालाजी केशव जाधव, आकाश संतोष जाधव यांनी माझे वडिल रामचंद्र बळीराम कोरडे यांना गावानजिक असलेल्या वाडीचा मारोती शेतशिवारात जुन्या वैमनस्यातून वाद घालत त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतक रामचंद्र कोरडे यांचा मृतदेह शवविच्छतेदनासाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी चौघांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यातील तीन आरोपी फरार आहेत; तर आकाश संतोष जाधव नामक आरोपीस अटक करण्यात आली आहे.