विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: February 18, 2015 01:54 IST2015-02-18T01:54:59+5:302015-02-18T01:54:59+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील घटना.

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
मंगरूळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील भूर येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. फिर्यादी अनिता संतोष कोल्हे (२0) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष कोल्हे, मारोती कोल्हे, तुळसाबाई कोल्हे रा. भूर यांनी संगनमत करून घर बांधण्यासाठी माहेरहून ७0 हजार रुपये आण यावरून मानसिक व शारीरिक छळ केला व विष पाजले. या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध कलम ३0७, ३९८ अ ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.