वाशिम जिल्ह्यात घटतेय कुपोषितांची संख्या !
By Admin | Updated: July 5, 2017 19:15 IST2017-07-05T19:15:19+5:302017-07-05T19:15:19+5:30
वाशिम - आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्त्वांच्या अभावाने २०१३ साली नशिबी कुपोषण आलेल्या १२०० बालकांच्या चेहऱ्यावर २०१७ सालात "सुदृढ" हास्य फुलले आहे.

वाशिम जिल्ह्यात घटतेय कुपोषितांची संख्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्त्वांच्या अभावाने २०१३ साली नशिबी कुपोषण आलेल्या १२०० बालकांच्या चेहऱ्यावर २०१७ सालात "सुदृढह्ण हास्य फुलले आहे. महिला व बालकल्याण विभागाने राबविलेल्या विविध योजना व उपक्रमामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत कमालिची घट झाली असून दोन हजारावरून हा आकडा ५०२ वर आला आहे.
कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. सन २०१३ पर्यंत वाशिम जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या दोन हजारांच्या घरात होती. त्यानंतर कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रीत करणे, अंगणवाडी स्तरावरील ग्राम बालविकास केंद्रांमध्ये कुपोषित बालकांच्या आरोग्याची ३० दिवस विशेष काळजी घेणे, अतिरिक्त आहार पुरविणे आदी प्रयत्न करण्यात आले. परिणामी कुपोषित बालकांची संख्या ५०२ वर आली आहे.