वाशिम जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १०२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:09 IST2020-10-10T13:09:03+5:302020-10-10T13:09:39+5:30

CoronaVirus in Washim जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे.

The number of coronabalis in Washim district is over 100 | वाशिम जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १०२ वर

वाशिम जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १०२ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात शुक्रवारी चौघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात मैराळडोह, वाघी बु., तोंडगाव आणि कारंजा लाड येथील प्रत्येकी १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८९६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४१३३ जणांनी कोरोनावर मात केली, तर ६६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या स्थितीनुसार कोरानामुळे मृत्यूंचे प्रमाण घटत असल्याचे दिसले तथापि, शुक्रवार ९ आॅक्टोबर रोजी कोरोना संसर्ग झालेल्या चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ झाली असून, जिल्ह्यातील आजवरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता १०२ झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी जिल्हयात आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील चंडिकावेस येथील १, कारागृह परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील १, टिळक चौक येथील १, राजनी चौक येथील १, साई नगर येथील १, पंचशील नगर येथील १, उमरा कापसे येथील १, देपूळ येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, म् वनोजा येथील १, हिरंगी येथील ३, मोहरी येथील ४, धानोरा खुर्द येथील २, नागी येथील १, रिसोड शहरातील १ व्यक्ती मिळून २८ जण कोरोना बाधित आढळले.

Web Title: The number of coronabalis in Washim district is over 100