शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 04:01 PM2019-08-13T16:01:32+5:302019-08-13T16:10:10+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक महिन्यापासून रेबीजची लस उपलब्ध नाही.

No Rabies vaccine at Shirpur Primary Health Center | शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसच नाही!

शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील कित्येक महिन्यापासून रेबीजची लस उपलब्ध नसल्याने कुत्रा, माकड किंवा रानडुक्कर चावलेल्या रुग्णांचा जीव धोक्या येण्याची भिती आहे. त्यामुळे या औषघी ऊपलब्ध करणे आवश्यक आहे. परंतु औषधी ऊपलब्ध कपण्याऐवजी वाशिम किंवा अकोला करण्याचा सपाटा लागला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून शिरपूर आरोग्य केंद्राचा नावलौकिक आहे; मात्र या आरोग्य केंद्रात विविध समस्या कायमच आहेत. फार मोठ्या प्रमाणात व्याप्ती असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक महिन्यापासून रेबीजची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्या, रानडुकरांनी चावा घेतलेल्या रुग्णांना सतत वाशिम किंवा अकोला रेफर केले जाते. जिल्ह्यातील मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजसह ईतर औषध औषधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यशवंत देशमुख यांनी केली आहे.

 
सर्पदंश ऊपचाराचीही औषधी नाही
शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस उपलब्ध नाहीच शिवाय साप रिंवा विंचूसारख्या विषारी जिवांनी घेतलेल्या चाव्यावर ऊपचारासाठीही आवशेयक औषधी नाही. अशातच ११ ऑगस्ट रोजी शिरपूर येथील कावेरी गजानन देशमुख या ४५ वर्षीय महिलेस सर्पदंश झाला होता. या सर्पदंश बाधित महिलेच्या उपचारासाठी योग्य ती औषधे नसल्याने तिला सुद्धा वाशिम येथे रेफर करण्यात आले होते. तर मागील महिन्यात विंचू रान डुक्कर चावलेला लोकांना तर अकोला रेफर येथे करण्यात आले होते.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात येते. येथे आवश्यक औषधे ऊपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आलेली आहे.
- डॉ संतोष बोरसे
तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव.

Web Title: No Rabies vaccine at Shirpur Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.