शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क, ना डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:32 IST

Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रेल्वे स्थानकाहून इंटरसिटी एक्स्प्रेस यासह इतर पाच ते सहा पूर्णत: आरक्षित रेल्वेगाड्या सुरू आहेत. आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. १ मार्चला दुपारी केलेल्या पाहणीत हा प्रकार आढळला.कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. वाशिमसह आसपासच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांसोबत मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही कोरोनाने पुन्हा विळख्यात घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने अद्याप पॅसेंजर रेल्वे सुरू केलेली नाही; मात्र, तिरूपती-अमरावती, जम्मू तावी-नांदेड, जयपूर-हैद्राबाद, जयपूर-सिकंदराबाद या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्णत: आरक्षित या नियमांखाली सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. असे असताना कारवाईकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

‘विना मास्क’वर कारवाई नाहीचवाशिम रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी काही जण ‘विना मास्क’ वावरताना दिसून आले. यासह काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. याप्रकरणी पाहणी करून रेल्वे विभागाच्या पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकही बेफिकीर असून कोरोनापासून बचावासाठी पुढाकार घेत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नियमित तोंडाला मास्क परिधान करायला हवा. यासह फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा. यासंबंधी कारवाईचे अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत तसे आदेश असल्यास निश्चितपणे कारवाई सुरू केली जाईल.- महेंद्र उजवे रेल्वेस्थानक अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन