शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणी चौकात रात्रीचा प्रवास धोक्याचाच; झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांसह पाटणी चौक, आंबेडकर चौक, रिसोड नाका पोस्ट ऑफिस चौकातून दुचाकी वाहनांद्वारे रात्रीचा प्रवास ...

वाशिम : शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांसह पाटणी चौक, आंबेडकर चौक, रिसोड नाका पोस्ट ऑफिस चौकातून दुचाकी वाहनांद्वारे रात्रीचा प्रवास धोक्याचाच झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या झुंडी प्रमुख रस्ते व चौकांचा ताबा घेत असून धावत्या दुचाकी वाहनाच्या मागे लागण्याचा त्यांचा त्रास बळावत चालला आहे. या भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली आहे.

स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना नसबंदीचे इंजेक्शन द्यायला हवे; मात्र याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून न.प.ने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शहरांतर्गत रस्ते व प्रमुख चौकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतच चालल्याचे दिसत आहे.

.........................

कुत्रे आवरा हो!

महिना श्वानदंश

जानेवारी - ०५

फेब्रुवारी - ०६

मार्च - ०३

एप्रिल - ००

मे -०२

जून - ०४

जुलै - ०८

ऑगस्ट - ०४

.........................

या चौकात जरा सांभाळून

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात रात्री ११ वाजेनंतर शुकशुकाट असतो. अशावेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडींकडून रस्त्याचा ताबा घेतला जातो. जवळून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्री लागतात. यामुळे अधूनमधून अपघात घडत असल्याच्या अनेक घटना गत काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत.

..................

पाच वर्षांपासून कुत्र्यांची नसबंदीच नाही

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याकरिता नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून निर्बीजीकरण (नसबंदी) प्रक्रिया राबविण्यात येते; मात्र वाशिम नगर परिषदेकडून गेल्या पाच वर्षांत एकदाही ही मोहीम राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे.

...............

(बॉक्स)

आठ महिन्यांत हजारावर ॲंटी रेबीज

वाशिम येथील पशुसंवर्धन विभागाकडून जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्याच्या कालावधीत हजारावर भटक्या कुत्र्यांना ॲंटी रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे नरेंद्र खानोजे यांनी दिली.

.................

चोराची नाही, कुत्र्याची भीती वाटते!

वाशिम शहरातील इंदिरा चौकात भटक्या कुत्र्यांचा अक्षरश: सुळसुळाट झालेला आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास चौकात उभे राहता येणेही यामुळे अशक्य झाले आहे. वाहनचालकांच्या अंगावर कुत्रे धावून जात असल्याने अपघात घडत आहेत.

- अविनाश मारशेटवार

.............

राजनी चौक, धृव चौकात रात्री १० वाजेपासूनच भटकी कुत्री एकत्र जमणे सुरू होते. त्यांच्याजवळून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर ते भुंकत असल्याने दहशत वाढली आहे. रात्रीच्या सुमारास चोराची नाही; पण कुत्र्यांची भीती वाटते!

- पवन राजगुरू

....................

कोट :

वाशिम शहरात निश्चितपणे भटक्या कुत्र्यांचा त्रास बळावला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेली भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

- जितू बढेल, आरोग्य निरीक्षक, न.प., वाशिम