वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:16 PM2019-11-17T15:16:33+5:302019-11-17T15:16:44+5:30

शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.

Native people overcome drought scientifically! | वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुष्काळाच्या दृष्टचक्रातून कायमचे बाहेर पडायचे असेल तर शेतशिवारांमध्ये पाणी अडविण्यासोबतच वाहून जाणारी सुपीक माती धुऱ्याच्या बाहेर जाता कामा नये, हे सूत्र अंगीकारून तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील शेतकऱ्यांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने जल व मृद संधारणाचे काम करण्यात आले. यामुळे सद्या तेथील शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.
पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक, राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त शेतकरी सुभाष नानवटे यांनी गत तीन ते चार वर्षांपासून गावाला दुष्काळाच्या छायेतून कायमचे बाहेर काढण्यासाठी गावकºयांच्या सहकार्याने विविध स्वरूपातील प्रयोग केले. त्यात प्रामुख्याने शेतशिवारांमध्ये ठिकठिकाणी सीसीटी, दगडी बांध, माती नाला बांध, धुºयावर वृक्षलागवड आदी उपक्रमांचा समावेश आहे. जलसंधारणाची ही कामे परिणामकारक ठरली असून माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबतच वाहून जाणारी माती अडविणे साध्य झाले आहे.
शेतशिवारांमध्ये विविध ठिकाणी श्रमदानातून प्रत्येक एक घनमीटर खोलीचा खड्डा तयार करण्यात आला. प्रत्येक खड्डयात हजार लीटर याप्रमाणे लाखो लिटर पाणी साठविणे यामुळे शक्य झाले. शेतातील ज्या भागातून माती वाहून जाते, त्याठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे शेतांमधील सुपीक माती शेतातच राहून उत्पादनात वाढ झाल्याचे सुभाष नानवटे यांनी सांगितले.
 

खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न
गावात कधीकाळी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायचे. पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागायचा. जलसंधारणाच्या विविध कामांमुळे मात्र परिस्थिती पूर्णत: बदलली असून खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी सुभाष नानवटे यांनी दिली.

Web Title: Native people overcome drought scientifically!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.