शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची लूट कधी थांबणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:44 IST

वाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आहे. विविध वस्तू व सेवांच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट कधी थांबणार? असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठेतील राजा म्हणून ग्राहकांकडे पाहिले जाते. मात्र, विविध प्रकारची प्रलोभने, अन्न भेसळ, बनावट वस्तू आदींमुळे हा ‘राजा’च वस्तू, साहित्य खरेदी करताना संभ्रमात पडला आहे. अनेकवेळा फसवणूकही होते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने, चांदीचे नाणे मोफत मिळेल यासह विविध प्रलोभने दाखवून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागले असल्याचे दिसून येते. दैनंदिन व्यवहारात भेसळयु्क्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजनमापात फसवणूक, छापील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त किंमत आकारणे पाहावयास मिळते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे कायदा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा असे निरनिराळे बरेचसे कायदे अंमलात आले. मात्र, या कायद्याची अनेक ग्राहकांना माहिती नसते तर अनेकवेळा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही. त्यामुळे विविध माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत.  बिलांच्या पावतीलाही खोवस्तू व पदार्थ्यांच्या किंमतींमधून ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच शासनाचा कर बुडू नये म्हणून प्रत्येक ग्राहकांना बिलाची पावती देणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमाची दुकानदार व व्यावसायिकांकडून बºयाच प्रमाणात पायमल्ली होते. मागणी केल्याशिवाय बिल दिले जात नाही, याचा प्रत्यय ग्राहकांना येतो.  अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याचाही धाक नाही‘अन्ना’शिवाय मानवी शरिरात जीवंतपणाच राहू शकत नाही. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून स्वत:ची तुंबडी भरणारी टोळीच सक्रिय झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोणत्या क्षेत्रातून पैसा कमवावा याचेही भाव या महाभागांना राहिले नसल्याने ते इतरांना जणू मरणाच्या दारातच नेऊन सोडत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करणारा स्वतंत्र विभागही स्थापन झाला. मात्र, या विभागालादेखील ही भेसळ रोखता आली नसल्याचे दिसून येते. वस्तू खरेदी करताना अशी घ्यावी काळजी१) फसव्या प्रलोभनांना बळी पडू नये.२) वस्तू खरेदी करताना एमआरपीपेक्षा जास्त रक्कम देऊ नका३) वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.४) डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा५) वस्तू खरेदी करताना ‘एक्सपायरी डेट’ तपासा६) आॅनलाईन खरेदी करताना सजग राहा७) काही शंका, तक्रार असेल तर ग्राहक न्यायालय तसेच जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी

टॅग्स :washimवाशिमconsumerग्राहक