'माय प्राइड, माय वाशिम'; सेल्फी पॉइंटची तोडफोड

By दिनेश पठाडे | Updated: September 1, 2023 17:13 IST2023-09-01T17:11:53+5:302023-09-01T17:13:25+5:30

वाशिम नगर परिषदच्या वतीने शहरात तीनठिकाणी विविध स्लोगन असलेले सेल्फी पॉइंट उभारले आहेत.

'My Pride, My Washim'; Selfie point vandalism | 'माय प्राइड, माय वाशिम'; सेल्फी पॉइंटची तोडफोड

'माय प्राइड, माय वाशिम'; सेल्फी पॉइंटची तोडफोड

वाशिम :  नगर परिषद परिसरात असलेला माय प्राइड, माय वाशिम अर्थात माझा अभिमान माझे वाशिम या आशायाच्या सेल्फ पॉइंटची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

वाशिम नगर परिषदच्या वतीने शहरात तीनठिकाणी विविध स्लोगन असलेले सेल्फी पॉइंट उभारले आहेत. हे सेल्फी पॉइंट शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकत आहेत. क्रीडांगण परिसरात आय लव्ह स्पोर्ट्स, अकोला नाका येथे गर्जा महाराष्ट्र माझा  व  नगर परिषद येथे माय प्राइड माय वाशिम अशा आशया सेल्फी पॉइंट बसविले आहेत. त्यात आकर्षक विद्युत रोषणाई केली असल्याने रात्रीच्या वेळी लक्ष वेधून घेत आहेत. अनेकजण याठिकाणी सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.

अज्ञान व्यक्तीने विकृतपणाचा कळस गाठत नगर परिषद इमारतीच्या भिंतीवर मुख्य रोडलगत असलेला 'माय प्राइड माय वाशिम' या फलकाची तोडफोड केली. याप्रकरणी नगर परिषदच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन वाशिम शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला.

Web Title: 'My Pride, My Washim'; Selfie point vandalism

टॅग्स :washimवाशिम