शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

‘मुद्रा’च्या जिल्हास्तरीय समितीत होणार फेरबदल; लोकसंख्येनुसार ठेवली जाणार सदस्यसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:45 PM

वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हा नियोजन अधिकारी राहणार सदस्य सचिवअशासकीय सदस्यांची संख्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकाºयांऐवजी जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव राहतील.

वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे.यासंदर्भात नियोजन विभागाने ३० जानेवारी रोजी पारित केलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे, की यापूर्वी मुद्रा बँक योजनेच्या जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये ४ अशासकीय सदस्यांची नेमणूक होत असे. त्याऐवजी आता जिल्हानिहाय समन्वयक समितीमधील अशासकीय सदस्यांची संख्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार, राज्यातील २५ लाखांपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये अशासकीय सदस्यांची संख्या ६ राहणार असून २५ ते ५० लक्ष लोकसंख्येसाठी ९ आणि ५० लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात १२ अशासकीय सदस्य राहणार आहेत. याशिवाय नव्याने गठीत केल्या जाणाºया जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजनेच्या समन्वयक समितीमध्ये जिल्हा माहिती अधिकाºयांऐवजी जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव राहतील; तर जिल्हा माहिती अधिकारी सदर समितीचे सदस्य राहतील, असे कळविण्यात आले आहे.यासंदर्भातील नियोजन विभागाचे निर्देश प्राप्त झाले असून मुद्रा बँक योजनेची समिती नव्याने गठीत करित असताना त्याचे पालन केले जाईल. योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी देखील सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत.- राहुल व्दिवेदीजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना