शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे दिवाळीच्या दिवशी आंदोलन

By admin | Updated: October 25, 2014 00:17 IST

‘चटणी-भाकर’ खावून अभिनव आंदोलनाने वेधले लक्ष, वाशिम जिल्हाधिका-यांना दिले निवेदन.

वाशिम :गोवर्धन येथील गजानन भिकाराव वाघांसह इतर शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी दीपावलीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खावून आंदोलन केले.या आंदोलनामागे केवळ वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर आजघडीला ओढावलेल्या विविध संकटांसह जगणे मुश्कील झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाला जागे करण्याचीच भूमिका होती. या आंदोलनादम्यान वाशिम जिल्ह्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकर्‍यांकडील थकीत कर्ज तत्काळ माफ करुन त्याना नव्याने बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, चालू खरीप हंगामात सर्व शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी किमान दहा तास अखंडित वीज पुरवठा द्यावा, शेतकर्‍यांना शेतीकर्ज काढणीसाठी लागणारा कर्ज नसल्याचा दाखला विनामूल्य देण्यात यावा, आदी प्रमुख मागण्या शेतकर्‍यांनी केल्या. या आंदोलनात गजानन वाघ यांच्यासह प्रल्हाद कानडे, मनोहर भवर, सुभाष ढोकणे, अकाश वाघ, संतोष नवले, मोतीराम वर्‍हाडे, विश्‍वनाथ ढोकणे, हिम्मतराव वाघ, पांडुरंग वाघ, प्रल्हाद अंभोरे, निलेश ढोकणे, विक्रमा जाधव, महादेव ठाकरे, दिनकर वाघ, पंकज वाघ, संदेश वाघ, गजानन कु. वाघ आदी सहभागी झाले होते. गतवर्षी अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्‍यांची उभी पिके नेस्तनाबूत केली. खरीप व रब्बी हंगामानंतर निदान यावेळच्या खरीप हंगामात तरी निसर्गाची कृपा होईल, असे वाटत होते; परंतु यावर्षीचा खरीप हंगाम व नगदी असलेले सोयाबीनचे पीक अल्प पावसामुळे पूर्णत: संपले. त्यामुळे आधीच गतवर्षीच्या संकटाने कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत ढकलला गेला आहे. या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या ३ नोव्हेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवशी किमान १00 शेतकरी अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करतील, असा इशारा सुभाष देव्हढे यांनी दिला आहे.