रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 17:33 IST2019-05-14T16:51:55+5:302019-05-14T17:33:56+5:30

दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.

Motorcycle burn in risod | रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : गॅरेजमधून सर्व्हिसींग करून रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात दुचाकी वाहन पूर्णत: जळून खाक झाले. या विचित्र घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.


प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील प्रविण हिवाळे यांनी आपले दुचाकी वाहन गॅरेजमधून सर्व्हिसिंग केले. यादरम्यान वाहन रस्त्यावर उभे करून ते पाणीपुरी खाण्याकरिता एका गाडीवर गेले. यावेळी अचानक वाहनाच्या पेट्रोल टाकीनजिक आग लागली. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने वाहन पूर्णत: जळून खाक झाले. वाढत्या उन्हामुळे घडलेल्या या घटनेने नागरिक चांगलेच धास्तावले असून या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

Web Title: Motorcycle burn in risod