मंगरुळपीर-मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल-बस अपघात; दोन भाऊ जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:14 IST2018-01-09T17:10:42+5:302018-01-09T17:14:21+5:30
मानोरा : मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल व एस.टी.बसची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली.

मंगरुळपीर-मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल-बस अपघात; दोन भाऊ जागीच ठार
मानोरा : मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल व एस.टी.बसची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली.
दिग्रस आगाराची अकोला - दिग्रस बस पोहरादेवी- मानोरा मार्गे अकोला येथे जात होती. तसेच मंगरुळपीर वरुन मोतसावंगा येथील दोन भाऊ विजय बालाजी बोंडे वय २२ व विष्णु बालाजी बोंडे वय १९ हे नवीन हिरो डिलक्स मोटार सायकलने मानोराकडे येत होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच.४० एन.८४५३ या बसने मोटार सायकलने येणाऱ्या गाडीला जोराची धडक रोहणा फाटयनजीकच्या वळण रस्त्यावर दिली. या धडकेत दोघेही सख्ये भाऊ जागीच ठार झाले. सदर घटना घडल्याची वार्ता परिसरात पसरताच बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा केला. अपघात घडल्यानंतर एस.टी.बसचा चालक स्वत:हुन हजर राहुन मानोरा पोलिस स्टेशनला माहिती दिली.