ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 07:32 PM2020-09-28T19:32:20+5:302020-09-28T19:32:30+5:30

जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

MNS bell ringing agitation for wet drought | ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

googlenewsNext

वाशिम : मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानाचे त्वरीत पंचनामे करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक द्यावी यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
वाशिम तालुक्यातील काटा गावात २२५ हेक्टर उस पीक आडवे झाले. मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम व मानोरा तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा नुसत्याच फुगल्या आहेत व झाडांची अवास्तव वाढ झाली असून, संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाली असून, जमीन खरडली आहे. एवढे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे नाहीत.याकडे शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बियाणे, खते पुरविण्यात यावी या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन केले. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: MNS bell ringing agitation for wet drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.