अल्पवयीन मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:34 IST2019-03-03T17:34:44+5:302019-03-03T17:34:48+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया केनवड येथील अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली, ती अद्याप (३ मार्च) घरी परतली नसून चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे.

अल्पवयीन मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया केनवड येथील अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली, ती अद्याप (३ मार्च) घरी परतली नसून चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली.
केनवड येथील शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारीला शाळेत जाण्याच्या निमित्ताने घरून निघून गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटूंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा ती आढळून आली नाही. अखेर पालकांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम ३६३ अन्वये घटनेची नोंद घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रतन बावस्कर करित आहेत.