घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 21:08 IST2019-09-12T21:07:05+5:302019-09-12T21:08:39+5:30
एक १७ वर्षीय मुलगा तलावात उतरला.

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू
ठळक मुद्दे ही घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
आसेगाव - घरगुती गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस अंतर्गत येणाऱ्या ग्राम मसोला खुर्द येथे घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी काही मंडळी गेली होती. यावेळी एक १७ वर्षीय मुलगा तलावात उतरला. त्याला बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.