शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसाचा शेतकर्‍यांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:06 IST

पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

ठळक मुद्देकाही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच नाही सर्वेक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्‍यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसंदर्भात शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.कारंजा लाड: लाडेगाव येथील काही शेतकर्‍यांच्या जवळपास १00 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला शेंगा धरल्या नसल्याचे समोर आले आहे.पिकांची पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. अपेक्षित उत्पादन घेता यावे म्हणून शेतकर्‍यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. आठवड्यापूर्वी शेतातील सोयाबीन शेंगाचे निरीक्षण केले असता, शेंगा धरल्या नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार सुटीच्या दिवशी पाहणी केली असता, सदर शेतात सोयाबीनला शेंगाच नसल्याचे निदर्शनास आले. मागील तीन वर्षाच्या सरासरीनुसार सोयाबीनचा प्रती एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. यावर्षी अनेक ठिकाणी शेंगाच धरल्या नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनला शेंगा का लागल्या नाहीत, यासंदर्भात कृषी विभागाने संशोधन करावे तसेच नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची मागणी शेतकर्‍यांनी सोमवारी केली.रिसोड: तालुक्यातील मोप गावासह अन्य गावांतील सोयाबीन, तूर व अन्य पिकांची स्थिती नाजूक असून, प्रशासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी मोप येथील शेतकर्‍यांनी रिसोड तहसीलदारांकडे सोमवारी केली. मोप परिसरातील गावांमध्ये मृग नक्षत्रात विलंबाने पावसाचे आगमन झाले. दरवर्षीपेक्षा  यावर्षी २0 दिवस उशिराने पेरणी झाली. परिसरात अल्प प्रमाणात व तेही अनियमित पाऊस पडला. सोयाबीन पिकाला शेंगा, फुले धरण्याच्या काळात  पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकर्‍यांनी वर्तविली. कर्ज काढून बी-बियाणे, खते, तणनाशक, फवारणी आदींचा खर्च केला आणि आता उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन विमा व इतर अनुदानाचा  लाभ देण्यात यावा, अशी मागणी विठ्ठल कोकाटे,  भिकाजी नागरे, डॉ. श्रीराम गरकळ, रामभाऊ नरवाडे, डॉ. रामेश्‍वर नरवाडे, संतोष घायाळ,  सरपंच  केशरबाई नरवाडे, अशोक नरवाडे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली.मानोरा: इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकर्‍यांच्या शेतामधील पिके पाण्याअभावी तसेच अळ्यामुळे नष्ट होत आहेत. सर्कलमधील गावाची पीक पाहणी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, पाहणी सात दिवसात न  केल्यास रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा जि.प. सदस्य अनिता राऊत यांनी मानोरा तहसीलदारांना निवेदनाद्वारे ४ सप्टेंबरला दिला. इंझोरी सर्कलमधील भोयणी,  म्हसणी, तोरणाळा, जामदरा, उंबर्डा व इंझोरी  गावात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडला नाही. पिकांवर किडीच्या प्रादुर्भावमुळे पिके नष्ट  होत आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने   तत्काळ इंझोरी सर्कलमधील पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा आपल्या स्तरावरून सात दिवसांच्या आत पिकांची पाहणी करण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर जि.प. सदस्य अनिता संतोष राऊत, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, संतोष राऊत, रमेश पवार, गोपीचंद राठोड,  सरपंच प्रकाश आडे, साहेबराव राठोड, काशीराम राठोड, नामदेव आडे, दत्ता राऊत, संजय राऊत, काशीराम गावंडे, लिलाबाई राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.