शेकडो वाहनधारकांची तहान भागविणारी "माऊली" पाणपोई
By Admin | Updated: April 23, 2017 19:45 IST2017-04-23T19:44:31+5:302017-04-23T19:45:48+5:30
उंबर्डाबाजार : कारंजा दारव्हा मार्गावरील गंगापुर फाट्यावरील पाणपोईचा माध्यमातून तहान भागविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून ग्राम गंगापुर येथील चव्हाण परिवार करीत आहे.

शेकडो वाहनधारकांची तहान भागविणारी "माऊली" पाणपोई
उंबर्डाबाजार : कारंजा दारव्हा मार्गावरील गंगापुर फाट्यावरील पाणपोईचा माध्यमातून उन्हाळ्याच्या दिवसात या मार्गावरील अनेक तहानलेल्यांची तहान भागविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून ग्राम गंगापुर येथील चव्हाण परिवार करीत आहे.
कारंजा ते दारव्हा मार्गावर गंगापुर फाटा असुन सोमठाणा पर्यंत एकही गाव मार्गालगत नाही, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात कुठेच पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची व्यवस्था नाही.नेमका हाच प्र्रकार ग्राम गंगापुर येथील दानशुर चव्हाण परिवााने हेरुन मातोश्री पार्वताबाई चव्हाण यांच्या स्मृती निमित्त सदगुरु सेवालाल माऊली पाणपोईच्या माध्यमातून गंगापुर फाट्यावर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जलसेवा सुरु करुन तहानलेल्यांची तहान भागविणयाचे काम करीत आहे. दररोज शेकडो नागरिक आपली वाहने थांबवुन गंगापुर फाटयावरील सदगुरु सेवालाल माऊली पाणपोईतील थंड पाण्याने आपली तहान भागवित आहे. गंगापुर येथील चव्हाण परिवारांच्या या स्तुत्य लोकोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.