मामाचा अल्पवयीन भाचीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:33 PM2020-11-10T12:33:33+5:302020-11-10T12:37:02+5:30

आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला.

Maternal Uncle rape his minor niece at her home in Washim District | मामाचा अल्पवयीन भाचीवर अतिप्रसंग

मामाचा अल्पवयीन भाचीवर अतिप्रसंग

Next
ठळक मुद्देपिडीत मुलगी ही रविवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान घरात एकटीच होती. आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला.

 लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा तालुक्यातील धामणी येथील १३ वर्षीय भाची ही घरात एकटी असताना आरोपी चुलत मामाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध ९ नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पिडीत मुलगी ही रविवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान घरात एकटीच होती. तिची आई घरातील बकºया सोडण्याकरीता गेली असता आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला. पिडीतेची आई घरात आली असता हा प्रकार निदर्शनात आला. कुणाला सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकही आरोपीने दिले. 
पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने, पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ४५२, ३७६, ५०६ भादंवी प्रमाने गुन्हा दाखल केल. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Maternal Uncle rape his minor niece at her home in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.