Maratha Reservation: मराठा समाजातील वकिलांचा ठिय्या आंदोलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:39 IST2018-08-07T12:38:31+5:302018-08-07T12:39:16+5:30
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

Maratha Reservation: मराठा समाजातील वकिलांचा ठिय्या आंदोलनात सहभाग
भजन-किर्तनाने गाजले आंदोलन : आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलनाची धग कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यात ७ आॅगस्ट रोजी समाजातील वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भजन-किर्तनाच्या माध्यमातूनही आरक्षणाच्या मागणीची आरोळी ठोकण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्वरूपातील आंदोलने केली जात आहेत. त्याची धग अद्याप कायम असून शासनस्तरावरून या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने ९ आॅगस्टला ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. याच मुद्यावर वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. त्यात दैनंदिन समाजबांधवांचा सहभाग वाढत असून ७ आॅगस्ट रोजी समाजातील वकिलांनी ठिय्या देवून आम्हीही सोबत असल्याचे जाहीर केले. यादरम्यान लोककलावंतांनी गीतगायनाच्या माध्यमातून आंदोलनात वेगळीच रंगत आणल्याचे दिसून आले.