मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:05 IST2018-01-29T19:34:54+5:302018-01-29T20:05:01+5:30
मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्या उपचारासाठी एक लाख रूपयांहून अधिक रकमेची गरज आहे; परंतु हातमजुरी करणारे माता-पिता त्याच्यावर उपचार कसे करावे, या चिंतेने व्यथित झाले आहेत.

मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत
नाना देवळे / लोकमत न्युज नेटवर्क
मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्या उपचारासाठी एक लाख रूपयांहून अधिक रकमेची गरज आहे; परंतु हातमजुरी करणारे माता-पिता त्याच्यावर उपचार कसे करावे, या चिंतेने व्यथित झाले आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील रहिवासी भानुदास सुर्वे हे अठराविश्वे दारिद्र्यात मोलमजुरी करून कुटुंंबाचे उदरभरण करतात. त्यांचा ओम हा १७ वर्षीय मुलगा १२ व्या वर्गात शिकत असून, त्याला गेल्या दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याच्या आजाराव भानुदास सुर्वे यांनी पोट उपाशी ठेवून उपचार केले. नातेवाईकांचे कर्ज काढत चार वेळा त्याच्यावर वर्धा, वणी आणि अकोला येथे चार वेळा शस्त्रक्रियाही केल्या; परंतु ओमच्या दुर्दैवाने त्या चारही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या. आता त्याच्यावरी पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज आहे; परंतु त्याचे भानुदा सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर असल्याने मुलाचा उपचार करण्यात ते असमर्थ ठरत आहेत. पोटचा गोळा बरा होऊन त्याने शिक्षण घ्यावे आणि आपले भविष्य उज्जल करावे, असे स्वप्न उराशी बाळगून असलेले भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी हालाखीच्या परिस्थितीने हतबल झाल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा वाढता आजार पाहून त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे समाजातील दानशुरांनी मदतीचा हात द्यावा, अशी आर्जव ते येथे तेथे फिरून करीत आहेत. दरम्यान, भानुदास सुर्वे यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन गावक-यांनी त्यांना थोडी आर्थिक मदतही केली आहे; परंतु त्यामध्ये उपचार करणे शक्य नसल्याने त्यांनी दानशूर व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले आहे.